
देवगड : देवगड येथे मोफत जनरल मेडिसिन शिबीर संपन्न झाले असून या शिबिराचा शिबिरार्थिनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला. देवगड तालुक्यात देवगड मेडिकल फाउंडेशन व फ्रेंड्स सर्कल देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले मोफत जनरल मेडिसिन शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडले. या शिबिरात कन्सल्टंट फिजिशियन डॉ. महादेव पोकळे, एम.डी. (मेडिसिन) यांनी मार्गदर्शन केले.या शिबिरात विविध निदान तपासण्या मोफत करण्यात आल्या –पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFT) बोन मिनरल डेन्सिटी (BMD) ECG ब्लड शुगर (BSL R) HbA1C लिपिड प्रोफाइल तसेच नॅब आय हॉस्पिटल, देवगड यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. ज्यांना चष्म्याची आवश्यकता होती त्यांना ५०% सवलतीत चष्मे देण्यात आले. तसेच ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता होती त्यांची शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहे.
शिबिरात बेसिक लाईफ स्किल (CPR) प्रशिक्षण देखील देण्यात आले, ज्यामुळे उपस्थित नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत जीवनरक्षक कौशल्यांची माहिती मिळाली.
गेल्या अनेक वर्षांपासून देवगड मेडिकल फाउंडेशनने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १००० हून अधिक मोफत आरोग्य शिबिरे आयोजित केली आहेत.डॉ. सुनील आठवले यांनी पुढील काळात आणखी अशा शिबिरांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले आहे. या शिबिराचा लाभ १०० पेक्षा अधिक रुग्णांनी घेतला.
डीएमएफ हेल्थकेअर प्रा. लि. चे संचालक डॉ. सुनील आठवले यांनी शिबिरात सहभागी झालेल्या डॉ. महादेव पोकळे, फ्रेंड्स सर्कल देवगडचे सदस्य, तसेच देवगडच्या नागरिकांचे आभार मानले.यावेळी या शिबिराच्या यशस्वी होण्यामागे देवगड मेडिकल फाउंडेशनच्या कर्मचारीवर्ग कादंबरी कणेरकर , शेफाली भागवत, अक्षता नागवेकर, सर्वेश मिठबावकर , रोशन कदम, दशरथ हक्के , सायली शिवगण, प्रसाद मेस्त्री, भूमिका परब, सानिया शिंदे, भाग्यश्री घारकर, स्नेहल कदम, सोनाली ढोके , सबुरी चव्हाण, सुमेधा पालकर, सानिका चव्हाण, राकेश कोयंडे, प्रसाद कदम, कृष्णा पेंडुरकर यांचे विशेष योगदान लाभले.










