वेंगुर्ल्यात जबरदस्त मंडळातर्फे शालेय मुलांची मोफत नेत्र तपासणी

Edited by: दिपेश परब
Published on: August 18, 2023 19:40 PM
views 185  views

वेंगुर्ला : येथील जबरदस्त सांस्कृतिक कला, क्रिडा मंडळ राऊळवाडा व एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला शाळा नं.१, वेंगुर्ला शाळा नं.४, शिवाजी प्रागतिक शाळा व परबवाडा शाळा नं.१ मधील पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. 

यावेळी डॉ. संजय जोशी, डॉ.विकास लुडबे, डॉ.गौरव गुरव, डॉ.विष्णू गोसावी यांनी मुलांची नेत्रतपासणी केली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष साबाजी राऊळ, सदस्य अजित राऊळ, स्वप्नील पालकर, बापू वेंगुर्लेकर, ज्ञानेश्वर रेडकर, चंदन रेडकर, मंगेश परब, कौशल मुळीक, विवेक राऊळ, ज्येष्ठ सदस्य अशोक कोलगांवकर आदी उपस्थित होते. या शिबिराला मंडळाच्या सदस्यांसहित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नीलिमा परब, मुख्याध्यापक कालिदास खानोलकर, शिक्षक अश्विनी देसाई, वंदना शितोळे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष वासुदेव परब, उपाध्यक्ष अस्मिता राऊळ, संदीप परब, सुनील परब, मुख्याध्यापक बेहेरे, हरमलकर, झोरे, लिना नाईक या सर्वांचं सहकार्य लाभले. जबरदस्त मंडळाच्या या उपक्रमाचे सर्व शाळांमधून कौतुक करण्यात आले.