
कणकवली : जागतिक महिला दिनानिमित्त कणकवली शहरात तेली आळी, डी पी रोड येथे राणे डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून महिलां व 15 वर्षाखालील मुलांसाठी मोफत दातांची तपासणी करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ही तपासणी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत आणि सायंकाळी 5 ते 8 पर्यंत करण्यात येणार आहे. यावेळी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे देखील मार्गदर्शन डॉ. शुभांगी धैर्यशील राणे हे करणार आहेत. त्यामुळे या दात तपासणीच्या शिबिराचा लाभ बहुसंख्य महिला वर्गांनी व 15 वर्षाखालील मुलांनी घ्यावा असे आवाहन राणे डेंटल क्लिनिक च्या माध्यमातून करण्यात येत आहे