गांवकर कुटुंबियांकडून होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकल

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 03, 2024 12:38 PM
views 178  views

मालवण : मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कुल मालवणच्या माजी विद्यार्थिनी शैला शंकर गांवकर यांच्या स्मरणार्थ चिंदर मधील गांवकर कुटुंबियांच्या वतीने टोपीवाला हायस्कुलच्या ४ गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शनिवारी मोफत सायकल विद्यार्थ्यांना सुपूर्द करण्यात आल्या.

गावकर कुटुंबियांच्या वतीने उद्योजक केदार गांवकर यांनी प्रशालेस तीन लाख देणगी स्वरूपात दिले आहेत. या रक्कमेतील २ लाख ७५ हजार रक्कम प्रशालेने बँकेत ठेव स्वरूपात ठेवली असून त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित केली जाणार आहे. आज ३ ऑगस्ट रोजी कै. शैला गांवकर यांच्या जन्मदिन निमित्ताने गावकर कुटुंबियांनी दिलेल्या २५ हजार रक्कमेतून चार गरजू विद्यार्थ्यांना सायकल वितरित करण्यात आल्या.

यावेळी मालवण एज्युकेशन सोसायटी संस्था चालक दिगंबर सामंत यांसह भाजपचे शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, आबा हडकर, टोपी वाला हायस्कुल चे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजू, पर्यवेक्षक विजय गोसावी, शिक्षक महेश धामापूरकर, पप्पू सामंत, श्याम वारंग आदी उपस्थित होते.