LIVE UPDATES

फोंडाघाट हादरले

भूकंप सदृश धक्क्यांनी 4 घरांचे नुकसान
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: June 24, 2026 13:22 PM
views 246  views

भिंतींना पडल्या मोठ्या भेगा

कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट येथील विद्यानगर-बेलदारवाडी परिसरात 23 जून 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 ते 11.45 वाजण्याच्या दरम्यान भूकंप सदृश धक्के जाणवले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या धक्क्यांमुळे परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत.

या घटनेत रविंद्र सुरेश चव्हाण, दत्ताजी सुरेश चव्हाण, सोमनाथ सुरेश चव्हाण तसेच बाळू मारुती चव्हाण यांच्या घरांना तडे गेले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सरपंच संजना संजय आग्रे यांनी सकाळी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित कुटुंबांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

सरपंच संजना आग्रे यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना घटनेची माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना आवश्यक मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

तसेच परिसरातील नागरिकांनी कोणतीही अडचण अथवा समस्या असल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा, असे आवाहन सरपंचांनी केले आहे.