LIVE UPDATES

दोडामार्ग पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी प्रशिक्षणासाठी पुणे येथे रवाना

सभापती, उपसभापती, सदस्य यांची उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 24, 2026 11:58 AM
views 71  views

दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीचे सभापती, उपसभापती यांसह सदस्य हे पुणे यशदा येथे खास प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. लोकाभिमुख प्रशासन चालवित असताना कायदा आणि प्रशासकीय पातळीवरील अद्ययावत बदल यांचे परिपूर्ण ज्ञान होण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण आवश्यक असतात. दोडामार्ग पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधीनी स्वतःला अपग्रेड ठेवण्यासाठी पुणे येथील यशदा मधील प्रशिक्षणास जाणे पसंद केले. या प्रशिक्षणात सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस, सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर, सोनिया नाईक सहभागी झाले आहेत.