
सावंतवाडी : गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावरील झाडाची भली मोठी फांदी मोटार सायकल स्वारावर पडली. सुदैवाने यात तो चालक बचावला. आज दुपारच्या दरम्यान ही घटना घडली.
गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर जीर्ण वृक्षाची भली मोठी फांदी पडली. दरम्यान, येथून जाणारे मोटार सायकलस्वार बालबाल बचावले. हा वृक्ष रस्त्याच्या बाजूला पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आहे. परंतु, अद्यापही त्याच्याकडे कुणाचे ही लक्ष गेल नाही. आज त्या जीर्ण झालेल्या वृक्षाची भली मोठी फांदी रस्त्यावर पडली. सुदैवाने मोठा अपघात टळला. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रवी जाधव यांनी रस्त्यावरील सर्व फांद्या उचलून वाहनांना रस्ता मोकळा करून दिला. जीर्ण झालेल्या वृक्षाचा धोका अजूनही टळला नसून संबंधित जीर्ण झालेल्या वृक्ष मालक यांनी हा जीर्ण झालेला वृक्ष तातडीने तोडून घ्यावा व पुढे होणारा अनर्थ टाळावा अशी विनंती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.