
देवगड : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित विजयदुर्ग दीपोत्सव 2024 ऐतिहासिक सोहळा विजयदुर्ग किल्ल्यावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या वेळी पोर्ट ऑफीस येथून ढोल ताशांच्या गजरात या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते या मिरवणूकीचा शुभारंभ झाला.
त्या पालखी मिरवणुकीत शिवप्रेमी मंडळे सहभागी झाली होती. तत्पूर्वी सकाळी सागरी सीमा मंच कोकण प्रांतच्या वतीने विजयदुर्ग बंदरात मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते विजयदुर्ग अशा शिवकालीन शिडाच्या बोटी दाखल झाल्या होत्या. शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. या पालखीचे नेतृत्व गिर्ये - रामेश्वर ग्रा.पंचायत सरपंच लता गिरकर,नवनिर्वाचित सरपंच पुजारे, तसेच महिलांनी केले. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यावर दर्या सारंग सरखेल कान्होजी आंग्रे रंगमंचावर मंचावर शिवरायांची आरती करण्यात आली. त्यानंतर किल्ले विजयदुर्ग वरील भवानी मातेच्या मंदिरात ढोल ताश्याच्या गजरात व छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला. यावेळी शिवभक्तांनी मातेच्या मंदिरात आरती केली. हातात मशाली घेऊन निघालेली ही भव्य मिरवणूक मंदिरातून दरबार हॉल येथे आल्यानंतर पण त्यांच्या प्रकाशमय वातावरणात व महराज्यांचा जयजयकार करत मानवंदना देण्यात आली. यानंतर पालखी विजयदुर्ग येथे हनुमान मंदिर येथे आणण्यात आली. या ठिकाणी जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या उपस्थिती शिवकालीन युद्ध कलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यातून शिवरायांचा इतिहास पुन्हा जागवण्यात आला. पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विजयदुर्ग चे सह पोलीस निरीक्षण हेमंत देवरे, सागरी सीमा मंच प्रांत संयोजक केतन अंभिरे,कोकण प्रांत संघटन मंत्री अनिकेत कोंडाजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रचारक सुमंत आमसेकर, इतिहास संशोधक रणजीत हीर्लेकर, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ अध्यक्ष चंद्रकात बिडये, सर्व सरपंच विजयदुर्ग,मुख्य सल्लागार राजेंद्र परूळेकर,नरेंद्र उपरकर आदी उपस्थित होते. रात्री सुर- झंकार हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.