
मालवण : आरमारी गाबीत समाज संस्थेच्यावतीने दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या किल्ला व आकाश कंदील स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून लहान गटात रुचा रामचंद्र चव्हाण तर खुल्या गटात सौ. शिल्पा यतीन खोत यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. किल्ला बनविणे स्पर्धेत वैभवी संदीप कोळगे हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
आरमारी गाबीत समाजाच्यावतीने दिवाळी निमित्त आकाश कंदील आणि किल्ला बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा चौदा वर्षाखालील आणि खुला अशा दोन गटांसाठी होती. जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी आरमारी गाबीत समाज संस्थेचे अध्यक्ष अविनाश कुबल, सहसचिव रवींद्र कोयंडे, सदस्य गणेश फडके, महेश जुवाटकर, भाऊ मोरजे, दामाजी मेथर, रवींद्र मुंबरकर यासह अन्य पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
या स्पर्धेला दोन्ही गटांसाठी उत्स्फूर्त प्रस्तिसाद मिळाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक करत स्पर्धकांना मार्गदर्शन केले. मुलांमध्ये अनेक कला असतात. मात्र, त्यासाठी तातडीने योग्य व्यासपीठ मिळत डंपर. पालकांनी सुद्धा मुलांना उत्तेजण करणे गरजेचे आहे. मालवणची ही परंपरा अशीच अबाधित ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. या संस्थेने आयोजित केलेली ही स्पर्धा दरवर्षी घ्याव्यात, जेणेकरून तुमचा आदर्श इतर तालुके सुद्धा घेतील आणि जिल्हाभरात अशा प्रकारच्या दरवर्षी स्पर्धा होऊन मुलांना व्यासपीठ मिळेल असे पराडकर यांनी सांगितले.
आकाश कंदील स्पर्धेत लहान गटात : प्रथम रुचा रामचंद्र चव्हाण, द्वितीय - तनिष्का यतीन खोत, तृतीय - भुवनेश दामाजी मेथर यांनी क्रमांक पटकावीला. तर खुल्या गटात प्रथम : सौ. शिल्पा यतीन खोत, द्वितीय - कु. समृद्धी महेश मयेकर, तृतीय - मृणाल अर्जुन मणचेकर, उत्तेजनार्थ - सुदेश संतोष रेवंडकर, सौ. ऋतू संजय गोवेकर, विशेष संकल्पना : रामकृष्ण गोविंद बांदकर. तर किल्ला बनविणे स्पर्धेत : प्रथम वैभवी संदीप कोळगे, द्वितीय - विराज येरम, तृतीय - एकता बालगोपाळ मित्रमंडळ, बाजारपेठ यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून निशिकांत पराडकर आणि समीर वर्दम यांनी काम पाहिले.