माजी सभापती शुभांगी पवार यांचे निधन

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 11, 2023 18:59 PM
views 256  views


वैभववाडी : तालुक्याच्या माजी पंचायत समिती सभापती शुभांगी पवार यांचे शुक्रवारी सायंकाळी खांबाळे येथील राहत्या घरी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला होता.त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. अखेर गुरुवारी सायंकाळी ४ वाजता त्यांचे निधन झाले. येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रीमती पवार ह्या खांबाळे गावच्या सरपंच होत्या.यानंतर खांबाळे पंचायत समिती मतदारसंघातून सदस्य म्हणून निवडून आल्या. सव्वा वर्षे त्यांनी तालुक्याच सभापती पद भूषवले होते. तसेच भाजपा महिला आघाडी प्रमुख पदाचीही काही वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.