माजी सैनिक बाळकृष्ण राऊळ यांचं निधन

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 21:04 PM
views 84  views

सावंतवाडी : नेमळे फौजदार वाडी येथील माजी सैनिक बाळकृष्ण सोनू राऊळ ( वय ६७) यांचे बुधवारी 5 जुलै रोजी गोवा बांबूळी येथे उपचारा दरम्यान आकस्मिक निधन झाले. देश सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 1992 मध्ये स्वर्गीय माजी आमदार जयानंद मठकर यांच्या नेतृत्वाखाली जनता दलातून सावंतवाडी पंचायत समितीचीं निवडणूक लडवून पाच वर्षे पंचायत समिती सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. यानंतर 2003 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून नेमळे ग्रामपंचायत निवडणूक लढवून पाच वर्षे उपसरपंच पद स्वीकारून गावातील मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणाचे तसेच इतर विकास कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याचे काम केले.

आपल्या कार्य काळात पदाला योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी केले. लोकांच्या वेळ प्रसंगास धावून जाणे, सामाजिक राजकीय कार्यात सतत अग्रेसर होते. सामाजिक क्षेत्रात देशसेवेसारखे एक सक्रिय सामाजिक कार्यकर्ता म्हणून ते प्रसिद्ध होते. त्याच्या अशा दुर्दैवी निधनामूळे नेमळे गावातील एक देशसेवक सामाजिक कार्यकर्ता हरवला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी जावई सुना नातवंडे असा परिवार आहे.