
सिंधुदुर्ग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख, जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिक भाईसाहेब गोवेकर यांचा ७५ वा वाढदिवस मालवण शिवसेना शाखा येथे गुरुवारी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते गुरुनाथ खोत, माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांच्या हस्ते शाल श्रीफळ, पुष्पहार घालून भाईसाहेब गोवेकर यांचा सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभच्छांचा वर्षांव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मालवण वासीय नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी वैभव नाईक म्हणाले,* १९९० मध्ये शिवसेनेचा पहिला बालेकिल्ला कोणता झाला असेल तर तो मालवण होता याचे संपूर्ण श्रेय भाईसाहेब गोवेकर यांचेच आहे. आजही ते त्याच तडफेने शिवसेनेसाठी काम करीत आहेत. याआधीही सिंधुदुर्गात शिवसेनेमध्ये फूट पडली तेव्हा भाई साहेब गोवेकर निष्ठावंत राहिले. त्यांचाच आदर्श आम्ही पुढे कायम ठेवला असून मी देखील शिवसेनेत एकनिष्ठ राहिलो आहे. समाजाला आदर्श देण्याचे काम भाईसाहेब गोवेकर यांनी केले आहे असे माजी आमदार वैभव नाईक यांनी सांगून भाईसाहेब गोवेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुनाथ खोत म्हणाले,* शिवसेनेवर अनेक संकटे आली,अनेक वेळा पडझड झाली. पण भाई गोवेकर हे आधारवड असल्याप्रमाणे आपल्या मागे उभे राहिले. केवळ मालवणच्याच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची ते आधारवड आहेत. भाईंच्या सोबतीने ९० च्या दशकात आम्ही जिल्ह्यात संघटना उभी केली. आणि आता ७५ व्या वर्षी देखील ते आपल्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत याच्यासारखी मोठी गोष्ट असू शकत नाही असे सांगितले.
१९७० सालामध्ये कोकणकन्या बोट मालवण बंदरात थांबत नव्हती म्हणून ती बोट भाई गोवेकर यांनी हायजॅक केली. त्याचबरोबर सिंधुदुर्ग किल्ल्यावर लावलेला झेंडा हटविण्यासाठी कलेक्टर आले त्यावेळी देखील भाई गोवेकर आणि आम्ही पोलिसांशी भला मोठा संघर्ष केला. तेव्हा आम्हा ५० ते ६० जणांना पोलिसांनी गाडीत कोंबून जेलमध्ये टाकले. भाईंनी आतापर्यंत स्वतःसाठी काहीही मिळविले नाही, शिवसेनेसाठी त्यांनी आपला सख्खा भाऊ देखील गमावल्याची आठवण उपरकर यांनी करून दिली.
भाई गोवेकरांनी शिवसेनेची निष्ठेने सेवा केली. नागरिकांच्या न्याय हक्कासाठी अनेक वेळा आंदोलने केली. राजकारणात चढ उतार होत असतात. आपल्याला संघटनेसाठी आणि जनतेच्या आशिर्वादासाठी काम करायचे आहे. भाईंचा आदर्श घेऊन तशा पद्धतीचे काम आपण करूया असे सांगून भाईंनी शंभरी पार करावी अशा शुभेच्छा पारकर यांनी दिल्या.
भाई गोवेकरांच्या हाताखाली काम करण्याची संधी मला मिळाली. त्यातून खूप काही शिकता आले. आर्थिक परिस्थिती नाही म्हणून भाई कधी थांबले नाहीत. गद्दारी करणाऱ्यांना त्यांनी अद्दल घडविली. मोदी - शहा यांनी शिवसेना फोडण्याचा कितीही प्रयत्न केला तरी भाई गोवेकरांसारख्या असंख्य निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आज महाराष्ट्रात शिवसेना आणि ठाकरे ब्रँड शिल्लक आहे. तो कोणीही संपवू शकत नाही.
माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहून सर्वांनी माझ्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. सामाजिक काम करताना मला अनेकांचे प्रेम मिळाले. बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही कॉलेज जीवनापासून शिवसेना या चार अक्षरासाठी झटत राहिलो. माझ्या राजकीय जीवनात व्यासपीठावरील व्यक्तींचे बहुमूल्य सहकार्य लाभले. त्याबद्दल गोवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे,कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट, मालवण शहरप्रमुख बाबी जोगी,पूनम चव्हाण, दीपा शिंदे, निनाक्षी मेथर, काँगेसचे बाळू अंधारी, काँग्रेसच्या पल्लवी तारी,उमेश मांजरेकर,किरण वाळके, रश्मी परुळेकर, प्रेमदत्त नाडकर्णी, नंदू गवंडी, नितीन वाळके, सदा लुडबे, मंदा जोशी, तृप्ती मयेकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगूत, राजा शंकरदास, चिंतामणी मयेकर, भगवान लुडबे, सिद्धेश मांजरेकर, अरविंद मोंडकर, राहुल जाधव, दशरथ कवटकर, हेमंत मोंडकर, यशवंत गावकर, किशोर गावकर, नागेश ओरोसकर, समीर लब्दे, प्रवीण लुडबे,अमोल वस्त, बाळा परब, प्रसाद चव्हाण,चंदू खोबरेकर, दादा पाटकर,नरेश हुले,रमेश कद्रेकर,परेश सादये, संदेश लाड,बाळा मसुरकर,प्रमोद राणे, उमेश चव्हाण,विद्या फर्नांडिस, गजा नेवळेकर, मोहन मराळ, विनोद सांडव, श्रीकृष्ण तळवडेकर, रवी तळाशिलकर,भाग्यश्री लाकडे, प्रदीप मयेकर, यतीन मेथर, बाळा आचरेकर,बॉनी काळसेकर, वासुदेव गावकर, बंड्या लुडबे, महेश देसाई, सचिन मालवणकर, अक्षय भोसले आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.