
दोडामार्ग : झरेबांबर गावठण वाडी येथील माजी सरपंच पांडुरंग गोपाळ गवस ( वय ७० वर्षे ) यांचे राहत्या घरी शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. श्री. गवस हे तालुक्यात पंचक्रोशीत 'भाई' या नावाने परिचित होते. गावात अनेकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गावातील देवस्थानचे प्रमुख मानकरी असून गावचे सरपंच पदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडे, विवाहित मुली, जावई, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.