सरमळेचे माजी सरपंच अर्जुन गावडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात

Edited by: विनायक गांवस
Published on: October 17, 2024 10:39 AM
views 169  views

सावंतवाडी : सरमळे गावचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, माजी सरपंच, अर्जुन गुणाजी गावडे यांनी कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ. अर्चना घारे -परब यांच्यावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी अर्जुन गावडे म्हणाले, अर्चना, ही आमची लाडकी लेक आहे आणि तिचे आज तळागाळातील कार्य पाहता त्यांची वाटचाल ही खूप लोकांना प्रेरणा देणारी व महिलांना आदर्शदायी अशी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी आपण कटिबद्ध राहून येत्या विधानसभेसाठी त्यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेन. यावेळी त्यांच्या समवेत रामदास सावंत, सावंतवाडी शहराध्यक्ष देवा टेमकर, नंदकिशोर साटेलकर, विनायक परब, सावंतवाडी विधान सभा युवक अध्यक्ष विवेक गवस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.