
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावचे माजी सरपंच महादेव गवस यांचं गोवा बांबोळी येथे अल्पशा आजराने उपचारा दरम्यान निधन झाले. ते मोर्ले गावचे सरपंच असताना त्यांनी केलेली लोकाभीमुख कामे तसेच तळागाळातील लोकांशी असलेला लोकसंपर्क यामुळे मोर्ले पंचक्रोशीत त्यांच्या निधनाची वार्ता कळताच या परिसरावर शोककळा पसरली आहे.
चार दिवसापूर्वी त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय दोडामार्गमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अधिक उपाचारासाठी गोवा बांबोळी येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी १४ मे रोजी संध्याकाळी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आज सकाळी त्यांच्या राहत्या गावी मोर्ले येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.