फोंडाघाटचे माजी एस. टी. कंट्रोलर शंकर गोसावी यांचे दुःखद निधन !

Edited by:
Published on: September 17, 2024 09:46 AM
views 277  views

फोंडाघाट : फोंडाघाट- गोसावीवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ तथा निवृत्त एस. टी. कंट्रोलर शंकर सखाराम गोसावी (७० वर्षे) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यांने सोमवार तारीख १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता, आकस्मिक निधन झाले. कार्यतत्पर, मितभाषी,परंतु करारी आणि आदरयुक्त लोकसंपर्क स्वभावामुळे, त्यांनी विविध स्थानकावरील सेवेत, लोकाभिमुख- मार्गदर्शक काम केले होते. गोसावीवाडी येथील श्री गणेश मंदिराच्या संपूर्ण उभारणी दरम्यान, लोकांच्या उदंड सहभागातून विविध कार्यक्रमाद्वारे, वाडीमध्ये अध्यात्म आणि व्यवहाराची सांगड युवाई ला घालून दिली होती. निवृत्तीनंतर वाडीवरील विविध कामासाठी ते आग्रही राहीले .त्यांच्या जाण्याने वाडीवरील पोकळी न भरून निघणारी असल्याची भावना वाडीवरील ग्रामस्थ- मित्रपरिवार आणि सच्चा दोस्त गमावल्याचे दुःख एस.टी. मधील सहकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यांचे पक्षात पत्नी चार मुली, व मुलगा तसेच जावई, सून, नातवंडे असा परिवार असून, फोंडाघाट परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.