
सावंतवाडी : माजी पंतप्रधान कै. डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता सभेतून अभिवादन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा योजना, भूमी अधिग्रहण कायदा, माहिती अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, वनाधिकार कायदा, तसेच भारत अमेरिका आण्विक करार या अशा अनेक जनसामान्यांचं आणि गरिबांचं आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतच झाल्या.
देशातील एक सभ्य, शांत, संयमी आणि सुसंस्कृत लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उद्या शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी सायं ६.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे ही कृतज्ञता सभा आयोजित केली आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही सावंतवाडीकर व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांनी केल आहे.