
वैभववाडी : कुसूर गावचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील यांनी आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधले.शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जातो.
श्री. पाटील यांच्यासोबत साहील पाटील, संदीप म्हापुसकर,प्रकाश साळुंखे यासह अनेकांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेची मशाल हाती घेतली.यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, सुशांत नाईक,सतिश सावंत, मंगेश लोके, नंदू शिंदे, रज्जब रमदुल,जावेद पाटणकर, भालचंद्र जाधव आदी उपस्थित होते.