मुंबईचे माजी महापौर आणि कोकणचे सुपुत्र विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन

प्राचार्य, महापौरपद ते विधानसभा निवडणूक लढवण्यापर्यंतचा प्रवास
Edited by: भरत केसरकर
Published on: May 09, 2023 09:37 AM
views 338  views

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने ज्येष्ठ नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या दरम्यान मुंबईचं महापौरपद भूषवलं होतं. ते कोकणातील कसाल गावचे सुपुत्र होते.   

विश्वनाथ महाडेश्वर यांचा जन्म १५ एप्रिल १९६० रोजी झाला होता. त्यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतलं. तसेच ते सांताक्रूझमधील राजे संभाजी विद्यालयाचे माजी प्राचार्य होते. २००२ मध्ये महाडेश्वर पहिल्यांदा नगरसेवक पदावर निवडून आले. त्यानंतर २०१७ मध्ये ते मुंबईच्या महापौर झाले. २०१७ ते २०१९ या कालावधीदरम्यान त्यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं. तसेच २०१९ त्यांनी विधानसभेची निवडणूकही लढवली होती.