कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांचं निधन

Edited by:
Published on: November 15, 2024 11:15 AM
views 1784  views

कणकवली : कणकवली शहराच्या माजी नगराध्यक्षा कांबळेगल्ली गणपती साना येथील रहिवासी सायली संजय मालंडकर (वय ५२) यांचे गुरुवारी सायंकाळी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर, जाव, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे.

गेली काही दिवस सायली या आजारी होत्या. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार करून पुढील उपचारासाठी बांबुळी येथे हलविण्यात आले होते. कणकवली शहरातील सामाजिक व राजकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रात देखील त्यांचा मोठा सहभाग होता. कणकवली नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष असताना त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. सोबतच कणकवली शहरातील मंडळातील महिलांच्या विविध ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह असणाऱ्या त्या महिला होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

शहरातील सामाजिक कार्यकर्ते रिक्षा व्यवसायिक संजय मालंडकर यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर उद्या सकाळी दहा वाजता कणकवली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.