आंबोली महोत्सवातील लाखोंची उधळपट्टी नेमकी कोणासाठी ? : शिवराम दळवी

Edited by: विनायक गावस
Published on: August 19, 2023 15:34 PM
views 863  views

सावंतवाडी : आंबोली पर्यटन महोत्सव हा जिल्हा प्रशासन आणि पर्यटन संचालनालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता .या पर्यटन महोत्सवात लाखोंची उधळपट्टी करण्यात आली .मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. या महोत्सवास स्थानिक व्यापारी ग्रामस्थांना विश्वासात घेतले होते. तरी काय आंबोली मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सोयीसुविधा देणे महत्त्वाचे आहे. असे असताना त्या सुविधा न देता महोत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उधळपट्टी नेमकी कोणासाठी केली, असा सवाल आंबोली येथील हॉटेल उद्योजक, माजी आमदार शिवराम दळवी यांनी केला आहे. 

 देशात एकमेव जिल्हा पर्यटन म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा असताना या जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. आणि या पर्यटन स्थळी ज्या सुविधा निर्माण व्हायला हव्या त्याकडे कधीही कोणी लक्ष दिला नाही. आणि आता मात्र पर्यटन महोत्सव भरून लाखोंची उधळपट्टी करण्यात आली. मात्र यातून नेमके या शासनाला काय करायचे होते तर आंबोली हे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, असे त्यांनी म्हटले आहे.


दरवर्षी जवळपास पाच ते सात लाख पर्यटक पावसाळी हंगामात येतात देशी-विदेशी पर्यटक आंबोलीचे पावसाळी हंगाम पाहण्यासाठी येत असतात. याचाच फायदा घेऊन आत्ताच ह्यांना या हंगामात पर्यटन महोत्सव घेण्याचा शोध लागला. त्यातून उधळपट्टी करण्याची सद्बुद्धी सुचली मात्र यांच्या नियोजनाप्रमाणे एकही पर्यटक या महोत्सवाकडे फिरकला नाही. त्यामुळे नेमक्या पर्यटन महोत्सवातून कोणत्या पर्यटकांचा फायदा झाला. किंवा स्थानिक व्यापारी ग्रामस्थ याना यातून काय साध्य झाले असा प्रश्नही श्री दळवी यांनी उपस्थित केला आहे.


 आंबोली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनात पत्रिकेमध्ये अनेक मंत्री आमदारांची नावे होती. मात्र त्यातील एक तरी मंत्री या पर्यटन महोत्सवाकडे आला का ? सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन कॅबिनेट मंत्री व एक केंद्रीय मंत्री असे चार मंत्री या जिल्ह्यातले आहेत. मग या मंत्र्यांनी तरी या पर्यटन महोत्सवाकडे येण्याचे सौजन्य तरी दाखवले का ?आंबोली पर्यटन महोत्सव प्रशासनाने भरवून म्हणे आम्ही आंबोलीचे पर्यटन वाढवत आहोत .असे ते सांगत आहेत. तर पर्यटन महोत्सवाला पर्यटन मंत्री का आले नाहीत .आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आंबोली पर्यटन महोत्सवाला म्हणे लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. नेमकी ही उधळपट्टी कोणासाठी केली गेली .याची चौकशी आम्हाला करावी लागेल.शासनाने हा महोत्सव भरवला होता .तर यासाठी किती खर्च झाला. हे त्यांनी जाहीर करावे. असे दळवी म्हणाले. 

या पर्यटन महोत्सवात महत्त्वाचा उद्घाटन कार्यक्रम एका ग्रामपंचायतीत आणि दुसऱ्या ग्रामपंचायत वेगळ्याच कामाचे उद्घाटन असे आगळे वेगळे पण या महोत्सवात दिसून आले. हे नेमके कशासाठी केले गेले. आंबोली हे थंड हवेचे व पावसाळी हंगामासाठी प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.मग या आंबोली मध्ये घाटात धबधबे आहेत .आंबोली घाट हा पश्चिम महाराष्ट्राने कर्नाटक गोवा असा जोडणारा घाट मार्ग आहे. मग या घाटाची सुरक्षित आहे का? रॅलींगची सोय नाही. मग पर्यटन महोत्सव कसले भरवता आंबोली घाटामध्ये पर्यटकांना पुरुष व महिला यांच्यासाठी शौचालयाची सोय नाही. आंबोली मध्ये पर्यटनाच्या दृष्टीने सोयी सुविधा पहिल्या निर्माण होणे आवश्यक आहे. त्या सुविधा शासनाने प्रथम द्यायला हव्यात आणि नंतर पर्यटन महोत्सव भरवावा असे शिवराम दळवी यांनी म्हटले आहे.

संकेश्वर - बांदा हा महामार्ग मंजूर झाला आहे .या महामार्गाचे प्लॅन अद्याप नाही. नेमका हा महामार्ग कुठून कसा जाणार याबाबत कुठलीही माहिती कुणालाच नाही मग भविष्याच्या दृष्टीने विचार करता. या महामार्गाचे भवितव्य ही काय? मग तुम्ही पर्यटन महोत्सव कशासाठी आणि कुणासाठी घेता आदी तुम्ही बांदा संकेश्वर महामार्गाबाबत नेमकेपणाने सांगा आदी आंबोली ही येथील स्थानिकाने योग्य पद्धतीने सांभाळली आहे असे असताना आंबोली मध्ये शासन स्तरावरून सर्व सुविधा मिळणे गरजेचे आहे ते करण्याऐवजी नको ते करून चुकीच्या पद्धतीने आंबोली प्रोजेक्ट करणे योग्य नाही. खरंतर आंबोली पर्यटन महोत्सवाबाबत मला नाविलाजा ने बोलावं लागत आहे कारण आंबोलीतील स्थानिक व्यापारी व ग्रामस्थांना या पर्यटन महोत्सवातून काय साध्य झाले किंवा भविष्यात काय उपयोग होणार आहे हे यातून नेमके स्पष्ट होत नाही असे दळवी यांनी सांगितले.

 आंबोलीतील सर्व रस्ते घाटातील घाट रस्ता सुरक्षित रॅलींग करणे तसेच सर्व स्पॉटवर सर्व सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करणे अशा सर्व बाबी साठी पैसे खर्च करणे आवश्यक आहे आणि मग काय ते महोत्सव भरवा खरंतर पर्यटन महोत्सव शासनाने भरवला असला तरी या पर्यटन महोत्सवातून किती पर्यटक या पाच दिवसात आले आणि किती जणांना फायदा झाला याचं कुठलंही गणित यांच्याकडे असणार नाही मात्र पैशाची उधळपट्टी मात्र निश्चित झाली आता तरी यातून सुधारा आणि आंबोली पर्यटनाच्या सुविधांकडे तरी लक्ष द्या जेणेकरून आंबोलीच्या पर्यटनाकडे लाखो पर्यटक वर्षाचे बारावी महिने हजेरी लावतील अशा सुविधा येथे उपलब्ध करून द्या तरच खऱ्या अर्थाने तुमच्या पर्यटन महोत्सवाचे सार्थक ठरेल पालकमंत्री आणि खासदार आमदार ही या पर्यटन जिल्ह्यात अनेक कामे आपल्या निधीतून करत आहेत पण त्यांचे कधी बोर्ड लागलेले आज दिसत नाहीत पूर्वी मात्र विकास कामे गावात झाली की बोट दिसायचे मग आता बोर्ड का दिसत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला विकास कामे होत आहेत की नाहीत हे कळतच नाही असावा श्री दळवी यांनी केला आहे मी या आंबोली पर्यटन भागात ४० वर्षांपूर्वी पहिलं थ्री स्टार हॉटेल उभारला आहे. त्यामुळे मला आंबोलीतील प्रत्येक भागाबद्दल जाण आहे त्यामुळे आंबोली मध्ये काय सुविधा असायला हव्यात आणि येथील स्थानिक यांना काय हवे याची मला कल्पना आहे म्हणून मला यानिमित्ताने बोलावे लागत आहे असे ते म्हणाले.