फोंडाघाट अवजड वाहनांसाठी खुला

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: July 12, 2024 15:41 PM
views 134  views

सिंधुदुर्गनगरी : देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग क्र १७८ वरील ४० वर्षापूर्वीची मोरी खचल्याने ९ जुलै ते १२ जुलै दरम्यान घाट रस्ता अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. मोरी दुरूस्तीचे काम पूर्ण झाले असल्याने राज्य मार्ग क्र १७८ वरील अवजड वाहनांची एकेरी वाहतूक व देवगड निपाणी रस्ता राज्य मार्ग १७८ वरील फोंडाघाट येथील अवजड वाहनांची वाहतूक १३ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून सुरू करण्यास हरकत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी कळविले आहे.