फोमेंतो रिसोर्सेस - गोगटे मिनरल्स अँड माईन्सच्यावतीने रेडीला मोफत अत्याधुनिक रुग्णवाहिका

आरोग्य तपासणी - मोफत औषधवाटपाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: दिपेश परब
Published on: October 14, 2023 14:53 PM
views 192  views

वेंगुर्ला : फोमेंतो रिसोर्सेस व गोगटे मिनरल्स अँड माईन्सच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या मोफत अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व मोफत औषधवाटप उपक्रमाला रेडीतील ग्रामस्थांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

    फोमेंतो रिसोर्सेस व गोगटे मिनरल्स अँड माईन्स रेडी गावात नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. यावेळी सुद्धा फोमेंतो रिसोर्सेसच्या वतीने रेडी गावातील रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या मोफत अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर फोमेंतो मिनरल्स रिसोर्सेसचे महाराष्ट्र प्रमुख नारायणप्रसाद यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. तर आरोग्य आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी उपसरपंच नमिता नागोळकर, फोमेंतो रिसोर्सेसचे डायरेक्टर डॉ. दीपक मूर्ती, एच  आर हेड कर्नल अरुण शर्मा, डिजएम लॉजिस्टिक्स बी एस गिल, मायनींग डिजीएम धर्मेंद्र पवार, प्रमोद सरोदे, गोगटे मिनरल्स अँड माईन्स मॅनेजर श्रीनिवासपुरे, प्रदोष गावकर, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, विनोद राणे, अण्णा गडेकर, सागर राऊत, गोपाळ राऊत, दत्तगुरु भगत, महेंद्र सातजी आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात डॉ प्रविण देसाई, डॉ प्रदीप शेटकर, डॉ. पी डी वजराटकर, डॉ दर्शना कोलते, कर्मचारी रामलाल रेडकर, मिलन पांढरे, समृद्धी नाईक, स्नेहा आडारकर आदी आदींनी काम पाहिले.