
सावंतवाडी : तळवणे वेळवेवाडी येथील उर्वरित जोडरस्त्याचे काम व डांबरीकरण कामास सुरुवात केली आहे. हा पुल पुर्ण झाल्यास तळवणे किनळे कवठणी या गावांचा संपर्क थेट जोडला जाऊ शकतो. या पुलाचे काम बरेच वर्ष अर्थवट अवस्थेत राहिल्यामुळे खडीकरणातील खडीवर रस्त्यावर आली होती. त्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरुन आपली वाहने चालवावी लागत असे. त्यामुळे तळवणेचे सरपंच गोवींद (समीर) केरकर यांनी वारंवार संबंधित खात्यांना पत्र व्यावाहार करुन शेवटी त्या कामांना यश आलेय. तळवणेचे सरपंच गोवींद(समीर) केरकर व उपसरपंच रामचंद्र गावडे व आदी सदस्य व नागरीकांच्या मदतीने हे यश साधता आले.