
सावंतवाडी : नगरपालिकेमध्ये डास निर्मुलन मोहीमेसाठी नवीन फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या आहेत. शहर रोगराईपासून मुक्त ठेवण्यासाठी वाढत्या डासांच्या पार्श्वभूमीवर युवा रक्तदाता संघटनेनं प्रशासनाच लक्ष वेधल होत. त्यांच्या पाठपुरावा यशस्वी ठरला असून डासांपासून आता सावंतवाडीकरांची मुक्ती होणार आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेकडून प्रांताधिकारी,मुख्याधिकारी व नगरपालिका प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहेत.
शहरवासीयांसाठी त्रासदायक असणारा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी प्रशासनाच लक्ष वेधल होत. प्रांताधिकारी हेमंत निकम यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. दरम्यान, आज नगरपालिकेमध्ये डास निर्मुलन मोहीमेसाठी दोन हँण्डल मशीन्स व मोठ्या २ फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या आहेत. शहर डासमुक्त करण्यासाठी ही प्रभावी मोहीम ठरणार आहे. युवा रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी सागर साळुंखे व सॅनिटरी इन्स्पेक्टर पांडुरंग नाटेकर यांचे संघटनेनं यासाठी आभार मानले आहेत. दरम्यान, शहरात उद्यापासून डास निर्मुलन फवारणीस सुरूवात होणार असल्याची माहिती न.प.चे सॅनिटरीइन्स्पेक्टर पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.