
सावंतवाडी : मुंबई इथं पार पडलेल्या एड्यूस्मार्ट इंकच्या नॅशनल अॅबॅकस, चित्रकला व हस्ताक्षर दुसऱ्या फेरीत फ्लाईंग टाॅटस भटवाडी सावंतवाडी शाळेचा विद्यार्थी कार्तिकेय अजय निकम याने ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या परीक्षेला देशभरातून हजारो विद्यार्थी बसले होते. तर याच स्कूलच्या शाश्वी शुभम नाईक हिने उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले आहे. याचबरोबर राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत किमया अमित राऊळ हिने सिनिअर गटात दुसरा क्रमांक तर चातुर्या धारगळकर हिने ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक मिळवला तर गिरिधर कोरगावकर - अॅबॅकस, निधी गुंजाळ अॅबॅकस, व श्रीशा गवस चित्रकला व रीयांश राणे - चित्रकला हे रिजनल अचिव्हर्स ठरले. या सर्वांचे शाळेचे मुख्याध्यापक आणि पालकांनी अभिनंदन केले.