
कुडाळ : सिंधुदुर्गात बुधवार पासून तुफान पाऊस बरसतोय. दडी मारलेल्या पावसाची पुन्हा एकदा जोरदार एन्ट्री केलीय. या पावसाने कुडाळात पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे अनेक मार्ग बंद पडलेत.
कुडाळ मधील भंगसाळ नदीची पातळी वाढली. हॉटेल गुलमोहर कडील मार्ग वाहतूकीस बंद झालाय. कुडाळ रेल्वेस्टेशन मार्ग बंद झाल्याने चाकरमानी यांचे हाल झालेत. दुकानवाड पुलावर पाणी आल्याने मार्ग बंद झाला आहे.