खारेपाटणमध्ये पूरस्थिती

शुकनदीने ओलांडली धोक्याची पातळी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 19, 2025 12:57 PM
views 190  views

कणकवली : गेले दोन-तीन दिवस पडणाऱ्या पावसामुळे आज मंगळवारी खारेपाटण येथील शुक नदिला पुराचे स्वरूप आले आहे. यामुळे खारेपाटण येथे पुरस्थिती निर्माण झाली आहे. खारेपाटण येथील अनेक जोड रस्ते पुराच्या पाण्याखाली गेले. यामध्ये मच्छिमार्केट, कोंडवाडी रस्ता, जैनवाडी या रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

बंदरवाडीकडे जाणारा घोडेपाथर येथे व खारेपाटण मुख्य बाजारपेठ रस्ता या रस्त्यावर अद्याप पाणी नाही. परंतु पावसाचा जोर असाच राहिला तर या दोन मुख्य रस्त्यांवरही पाणी येण्याची शक्यता आहे. सरपंच प्राची इस्वलकर यांनी खरेपाटण ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे तसेच प्रत्येकाने आपापली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणतेही आपत्ती परिस्थिती ओढवत असेल तर त्वरित ग्रामपंचायत किंवा दक्षता समिती कडे संपर्क करण्याचे आवाहन देखील सरपंच प्राची इस्ववलकर यांनी केले आहे.