
वेंगुर्ला : भाजपा च्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत "हर घर तिरंगा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमा अंतर्गत क्रांती दिनाचा निमीत्ताने भाजपा तालुका कार्यालयाच्या समोर ध्वजारोहण तर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी असलेल्या हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहुन क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना वेंगुर्ला तालुका निरीक्षक तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजु परब म्हणाले की, ९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला. हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट' हा क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हणतात. भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती. स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या स्मारकाची उभारणी या मैदानावर केली गेली आहे. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात गोवालीया टॅक येथून झाल्याने या मैदानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले असल्याचेही ते म्हणाले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा "हर घर तिरंगा" अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजन गिरप, जिल्हा कार्यकारणी सदस्य वसंत तांडेल, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सुरेंद्र चव्हाण, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , दिपक भगत, किर्तीमंगल भगत, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री व रमेश नार्वेकर, शक्तिकेंद्र जगन्नाथ राणे, कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.