कणकवली नगरपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण

पाच वर्षांमध्ये सत्ताधाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यकाळापासून प्रलंबित कामे लावली मार्गी
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 12, 2023 21:00 PM
views 567  views

कणकवली: कणकवली नगरपंचायतीचा  पाच वर्षाचा कार्यकाल आज 12 एप्रिल रोजी पूर्ण झाला आहे. आमदार नितेश राणे यांनी कणकवली वासियांना आमच्या हातात सत्ता द्या आम्ही तुम्हाला विकास देतो असा शब्द दिला होता. आणि तोच शब्द पूर्ण करण्यासाठी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व त्यांच्या सर्व नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात शहराचा कायापालट करण्यास सुरुवात केली. यात प्रामुख्याने मुलांच्या शिक्षणावर भर दिला त्यासाठी इंटरनॅशनल स्कूल कणकवलीत आणले.त्यानंतर प्रत्येक वाडी वस्तीत व नगरामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधा देखील पुरवल्या त्यामध्ये पाणी ,लाईट ,रस्ते ,गटारे , नाले व आरोग्याच्या सुविधा  नागरिकाला उपलब्ध झाल्या.

लहान मुले व युवा वर्गाला  खेळण्यासाठी क्रीडा संकुलन आणी गार्डन तसेच  व्यायाम शाळा, शहरातील महिला बचत गटांना विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना सक्षम बनवले. 

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आय लव कणकवली चा सेल्फी पॉईंट देखील उभारला आहे. बारा महिने वाहणाऱ्या धबधब्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले.  याच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काही वर्ष कोरोना कालावधी होता तरी देखील या कालावधीत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपला जीव धोक्यात टाकून कणकवली वासियांसाठी रस्त्यावर उतरत  कोविड सेंटर देखील उभारले आणि त्याचा फायदा कणकवली वासियांसह  सिंधुदुर्ग जिल्ह्याला पण झाला आणि प्रत्येक व्यक्तीचे लाखो रुपये वाचले त्यामुळे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी कोरोना काळात केलेल्या काम अतिशय उल्लेखनीय आहे.

 गेली पाच वर्षे आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या टीमने ग्रामपंचायत कार्य कलापासून असलेली प्रलंबित कामे मार्गी लावली आहेत.त्यामुळे पाच वर्षांपूर्वी आजच्या दिवशी निवडून येत कणकवलीच्या विकासाला चालना दिली आणि आज शाश्वत विकास कसा असतो हे त्यांनी दाखवून देत कणकवलीकरांची मन जिंकली आहेत.