
कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीमार्फत स्तुत्य उपक्रम केला गेला. नगरपंचायतीचे सेफ्टी टॅंक सफाई कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षितता नसते. या कारणामुळे त्यांना रोगराई व इतर आजार होण्याची शक्यता असते. कुडाळ नगरपंचायत मार्फत आज NAMASTE (NAMASTE- National Action for Mechanised Sanitation Ecosystem ) दिना निमित्ताने शहरातील सेफ्टी टॅंक सफाई कर्मचारी यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले या वेळी मा.मुख्याधिकारी श्री. अरविंद नातू , मा. नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर व नगरसेवक उपस्थित होते .
हा उपक्रम कामगारांच्या सुरक्षितता व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, त्यांना योग्य सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल आहे.