
वैभववाडी : हेत मांगवली फाटा येथे अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारे दोन टेम्पो ग्रामस्थांनी पकडले. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. टेम्पो मध्ये तीन जनावरे सापडली. पोलीसांनी दोन्ही टेम्पो जप्त केले. याप्रकरणी तात्या चोचे,तौफिक नंदकर,अल्लाउद्दीन इब्राहिम लांजेकर वय 32 सर्व रा.कोळपे जमातवाडी वैभववाडी,मोईन नाईक रा.तारळे ता. राधानगरी जि. कोल्हापूर,इरफान कबीर दरवेशी (वय 20) रा. गुडा राधानगरी, जिल्हा- कोल्हापुर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.