पाच फूटी अजगर आढळला मृतावस्थेत !

Edited by:
Published on: August 06, 2023 12:58 PM
views 479  views

सावंतवाडी : सकाळी साडेसहाच्या सुमारास सावंतवाडी मोती तलावा जवळ चिटणीस नाक्याकडील मारुती मंदिर नजीक रस्त्याच्या साईडला सुमारे पाच फूट लांबीचा अजगर मृत अवस्थेत असल्याचा आढळून आला.

मॉर्निंग वॉकसाठी जाणारे माजी नगरसेवक सुरेश भोगटे सत्यजित धारणकर संदीप धारगळकर संजय संजय मापसेकर विकास नारूळकर भावे यांनी तो पाहिला. माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी वन खात्याचे विनोद सावंत यांच्यामार्फत वन खात्याचे प्रमोद राणे यांना याबाबत माहिती दिली.