
बांदा : मडूरा ग्रामपंचायत निवडणुकीत मडूरा गावातील मतदार चि. विनोद अरुण वालावलकर यांनी डिंकवाडी मडूरा जि.प.शाळा क्रं.३ या मतदान केंद्रावर विवाहाच्या शुभमुहुर्ता अगोदर मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले...चि.विनोद यांचा आज दि.१८ डिसेंबर रोजी सावंतवाडी येथे दुपारी १२.४८ या शुभमुहुर्तावर विवाह सोहळा पार पडला...विवाहापुर्वी आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनव फाऊंडेशन सिंधुदुर्ग चे कार्यकर्ते श्री.विनोद वालावलकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.