प्रधानमंत्री आवास योजनेत लोरे नं २ ग्रामपंचायतीचा प्रथम क्रमांक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते होणार सन्मान
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: November 22, 2023 11:15 AM
views 108  views

वैभववाडी :  प्रधानमंत्री आवास योजनेत तालुक्यातील लोरे नं २ ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुंबई येथे गुरुवार दि २३नोव्हेबर रोजी सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान होणार आहे.

  केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना तालुक्यातील लोरे नं२ येथे प्रभावीपणे राबविण्यात आली.शासनाची ही योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यात आली. गावचे सरपंच विलास नावळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्रीमती कांबळे, श्रीमती हांडे यांनी विशेष मेहनत घेतली.ग्रामपंचायतीच्या या कामांची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आली. गावात यशस्वीपणे राबविलेल्या या योजनेमुळे लोरे गावचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. याबद्ल गावचे सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान होणार आहे.