राज्यस्तरीय आवास योजनेत पणदूर ग्रामपंचायत जिल्हयात प्रथम...!

माजी सरपंच दादा साईल यांचा यशस्वी पाठपुराव्याचा दावा
Edited by:
Published on: September 11, 2023 10:46 AM
views 57  views

ओरोस : एप्रिल 2022 ते मार्च 2023 या आर्थिक वर्ष्यात राज्यस्तरीय महाआवास योजना मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पणदूर ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज शरद कृषी भवन येथे वितरित करण्यात आला मात्र यावर भाजपाचे विद्यमान तालुकाध्यक्ष पणदुर गावचे माजी सरपंच दादा साईल यांनी माझ्या कारकिर्दीत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मी हा यशस्वी पाठपुरावा केला असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे.

आज जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्कृष्ट काम केलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायती, आदर्श ग्रामसेवक आणि आदर्श शिक्षक यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी 2022-23 या आर्थिक वर्ष्यात राज्यस्तरीय महाआवास योजने अंतर्गत रमाई आवास योजनेत जिल्ह्यात सर्वात जास्त घरकुले बांधून पूर्ण केल्याबद्दल कुडाळ तालुक्यातील पणदूर ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा पुरस्कार पणदुर ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यमान सरपंच पल्लवी पणदूरकर, उपसरपंच साबाजी मस्के आणि ग्रामसेवक सपना मस्के यांनी स्वीकारला आहे. मात्र भाजपाचे विद्यमान तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच दादा साईल, उपसरपंच बबन पणदूरकर, ग्रा.प.सदस्य आबा सावंत, मयुरी पणदूरकर, सुविधा सावंत, अनघा गोडकर, अंकिता राऊळ, किरण मोरे यांच्या कारकिर्दीत एप्रिल 2022 ते डिसेंबर 2023 या कालावधीत पणदूर सिद्धार्थ नगर मधील मागासवर्गीय लाभार्थ्यांना राज्यस्तरीय रमाई आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त घरकुले मंजूर करून ती बांधून पूर्ण केल्या बद्दल आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक देऊन जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या वतीने पणदुर ग्रामपंचायतला सन्मानित करण्यात आले असल्याचा दावा पणदूर माजी सरपंच दादा साईल यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सोशल माध्यमाच्या वतीने प्रसिद्ध पत्रक जाहीर केले आहे.