आसिया सांगावकर टेक फेस्टमध्ये प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: February 01, 2025 15:29 PM
views 350  views

सावंतवाडी : वुमेन्स बी सी ए कॉलेज सावंतवाडीची विद्यार्थिनी आसिया सांगावकर हिने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी मध्ये आयोजित टेक फेस्ट उपक्रमात ॲप डेव्हलपमेंट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. कुमारी आसिया ही तृतीय वर्ष बी. सी. ए. मध्ये शिकत असून संस्था कॉलेज पालक विद्यार्थी प्राध्यापक अशा सर्व स्तरांमधून तिच्या यशाबद्दल कौतुक केले जात आहे. राणीसाहेब शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.

वुमन्स कॉलेज तर्फे बीसीए डिग्री साठी जिल्हाभरातून मुलांचे प्रवेश घेतले जातात.बारावी उत्तीर्ण विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांच्यासाठी एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांचे मार्फत नियमित तसेच दुरुस्त बीसीए अभ्यासक्रम चालवला जातो. या अभ्यासक्रमासाठी ए आय सी टी इ व डी टी इ ची मान्यता असून त्याकरिता सीईटी ही प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. सीईटी परीक्षेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 10 फेब्रुवारी 2025 अशी आहे. संस्था व कॉलेज मार्फत अधिकाधिक विद्यार्थिनी व विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.