
सिंधुदुर्ग : सगळ्यांचं लक्ष लागलेली जिल्हा नियोजनची सभा आज होतेय. सत्तांतरानंतरची ही पहिली सभा होत असल्याने याकडे विशेष लक्ष लागलंय. रवींद्र चव्हाण पालकमंत्री झाल्यावर ही बैठक प्रथमच होत आहे. या बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक, माजी खासदार निलेश राणे, जिल्ह्यातील आजी -माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित असणार आहे. यानिमित्ताने सत्ताधारी - विरोधक समोरासमोर येत असल्याने नेमकं काय घडतंय याची उत्सुकता लागली आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण सभा
राजकीयदृष्ट्या जेवढी ही सभा महत्वाची आहे, तेवढीच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय यात घेतले जातील. निधीची तरतूद केली जाईल. त्यामुळे कुठल्या विकासकामांना किती निधी मिळतो, याकडेही लक्ष लागलंय.
सदस्य निवडीची शक्यता
DPDC च्या आजच्या बैठकीत सदस्य निवडीची शक्यता आहे. यासाठी कोणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल.
मात्र, DPDCच्या निमित्ताने सत्ताधारी - विरोधक पहिल्यांदाच समोरासमोर येत असल्याने ही सभा वादळी ठरण्याची शक्यता आहे.