मडुरा प्रशाळेच्या १९९८ - ९९ च्या दहावी बॅचचा पहिला स्नेहमेळावा

Edited by:
Published on: June 16, 2024 13:40 PM
views 308  views

बांदा : न्यू इंग्लिश स्कुल मडुरा प्रशाळेच्या सन १९९८-९९ च्या दहावी बॅचचा पहिला स्नेहमेळावा बांदा येथील हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट येथे उत्साहात संपन्न झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम व मनोगते सादर करून अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला.

यावेळी माजी मुख्याध्यापक वाय जे देसाई, श्री कोरगावकर, लक्ष्मण पावसकर, श्री पाटील, श्री गावडे, श्रीमती देसाई, श्रीमती विरनोडकर आदी उपस्थित होते. सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केलेत. तब्बल २५ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्र मैत्रिणींच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी व्यवसायानिमित्त दूर गेलेले हे विद्यार्थी २५ वर्षानंतर एकत्र आलेत. गावातील स्थायिक तसेच नोकरी निमित्त पूणे, मुंबई, गोवा, कतार, अमेरिका, दुबई अशा देश विदेशात असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग स्नेहमेळाव्यात यादगार ठरला.

नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी राजेश शेटकर, संदीप साळगावकर, संदीप मामा यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी संदीप भाईप, जोत्स्ना धुरी, प्रकाश शेर्लेकर, हेमंत मेस्त्री, महादेव मळगावकर यासंह ५० हून अधिक माजी विद्यार्थी उपस्थित होते.