
देवगड : देवगड येथील शिक्षण विकास मंडळ या संस्थेचे, श्रीमती. नीराबाई जगन्नाथ पारकर विद्यानगरीमध्ये, देवगड वासियांच्या मागणीनुसार आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्गमधील दुसरे आणि देवगड तालुक्यात प्रथमच ‘देवगड विद्यामंदिर’ हि CBSE बोर्डची इंग्रजी मध्यामची शाळा आज दि. २५ जून २०२४ रोजी सुरु करण्यात आली आहे. श्री. सदानंद जग्गन्नाथ पारकर व आदी मान्यवर यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पाडला.
जनार्दनशेठ तेली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, शिक्षण विकास मंडळ ही संस्था गेली पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ ज्ञानदानाचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ही संस्था नेहमी कार्यरत असते. तालुक्यात इंग्रजी माध्यमची शाळा सुरु करण्याचे संस्था पदाधिकारी तसेच सभासदांचे स्वप्न आज सत्यात साकार झाले. तसेच भविष्यातील शाळेबाबतच्या माहितीचे सादरीकरण सौ. शिवानी राणावत यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शरद शेटे यांनी केले.
सदरील उद्घाटन समारंभास शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकारी, संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. बाळासाहेब ढोके, उद्योगपती श्री. नंदुशेठ घाटे, श्री. राजाभाऊ कदम, महाविद्यालय विकास कक्षाचे चेअरमन, महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,ग्रामस्थ,पालक,पत्रकार आदी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते.