कणकवलीत फायर सेफ्टीचे नियम पाळले पाहिजेत : आ. नितेश राणे

Edited by:
Published on: April 01, 2024 08:11 AM
views 469  views

कणकवली : शहरात सकाळी एका मोबाईल शॉपीला आग लागली होती. त्यामध्ये लाखोंचं नुकसान झाले होते. त्यानंतर आ. नितेश राणे यांनी या दुकानाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी सांगितलं की कणकवलीत फायर सेफ्टी चे नियम पाळले गेले पाहिजेत. बिल्डिंगचे फायर ऑडिट देखील झाले पाहिजे. फायर सेफ्टीचे नियम डावलून कोण परवानगी देत असेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यावर देखील कारवाई होते. त्यामुळे लोकांच्या आयुष्याबरोबर कोणी खेळता कामा नये कुठलीही तडजोड होता कामा नये आज सुदैवाने त्यांचे दुकान जळले कोणतीही जीवितहानी झाली नाही, जर आग ही पसरली असती तर मोठे नुकसान झाले असते त्यामुळे कणकवलीकरांच्या जीवाशी कोणी खेळता कामा नये असे  निदेश राणे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे उपस्थित होते.