
शिरोडा:वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठत आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागून बाजारपेठेतील पाच दुकाने जळून खाक झाली. या पाचही दुकान मालकांना विशाल सेवा फाउंडेशन चे अध्यक्ष तथा भाजप युवा नेते विशाल परब यांनी विशाल सेवा फाउंडेशन च्या वतीने तत्काळ रोख स्वरूपात मदत दिली आहे. ही घटना समजताच विशाल परब यांनी भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्याजवळ ही मदत रोख स्वरूपात देत भविष्यात मदतीचा आधार दिला जाईल असे स्पष्ट केले. तर या घटनेनंतर विशाल परब यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. विशाल सेवा फाउंडेशन या दुकानदाराच्या पाठीशी असल्याची प्रतिकीया विशाल परब यांनी दिली आहे.