ओटवणेत फरसाण भट्टीला आग..!

Edited by: विनायक गावस
Published on: January 05, 2024 17:14 PM
views 150  views

सावंतवाडी : ओटवणे कापईवाडी येथील महेश बांदेकर यांच्या फरसाण भट्टीला आग लागून सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. हा प्रकार आज दुपारच्या सुमारास घडला. ऐन जत्रोत्सवाच्या हंगामात हा प्रकार घडल्यामुळे बांदेकर यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यांनतर सावंतवाडी नगरपालिकेच्या बंबाने तात्काळ धाव घेवून ही आग आटोक्यात आणली. नगरपालिकेच्या बंबाचे कर्मचारी नंदू गांवकर, अमोल शितोळे, सहदेव कदम, पांडुरंग कोळपकर यांनी त्यासाठी सहकार्य केले. हा प्रकार शॉर्टसर्किटने घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. महेश बांदेकर हे त्या ठिकाणी खाजासह फरसाण व अन्य साहित्य तयार करत, आज दुपारी अचानक त्यांच्या फॅक्टरीला आग लागली. हा प्रकार लक्षात आल्यामुळे अग्नीशमन बंबाला पाचारण करण्यात आले. परंतु, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. येथे जमलेल्या ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास यश आलं नाही. अखेर  बंबाच्या सहाय्याने आग विझवण्यात यश आले.