बिर्जे कुटुंबाला विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत

Edited by: विनायक गांवस
Published on: August 02, 2024 10:39 AM
views 188  views

सावंतवाडी : चराठे येथील शेतकरी यशवंत गणपत बिर्जे गावठाणवाडी यांचा घराची भिंत कोसळून यशवंत व गणपत बिर्जे हे दोघे ढिगार्‍याखाली सापडून जबर जखमी झाले होते. या बिर्जे कुटुंबाना तातडीची मदत म्हणून भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आर्थिक मदत केली. तसेच पुढील उपचारासाठी त्यांना व्हिजन हॉस्पिटलमध्ये स्वखर्चाने मदतीसाठी आश्वासन देखील दिले. यावेळी चराठा उपसरपंच अमित परब, माजी पंचायत समिती सदस्य गौरी पावसकर ,तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब, संतोष कोठावळे, ओमकार पावसकर, बाळा बोंद्रे, सुरेश परब, तनवी परब, सुरेश कोठावळे, आदी उपस्थित होते.