साटेली - भेडशीत आपतग्रस्त भगिनीला प्राथ. शिक्षकांची आर्थिक मदत

Edited by: लवू परब
Published on: April 10, 2025 14:41 PM
views 142  views

दोडामार्ग : साटेली भेडशी येथील श्रीम अंकिता अर्जून नाईक यांच्या घरी गॅस सिलेंडर चा स्फोट होऊन उडालेल्या आगीच्या भडक्यात नाईक कुटूंबाच फार मोठ नुकसान झालं. या दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबाला तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मदतीचा हात पुढे केलाय.

नविन घराच स्वप्न साकारायला निघालेल्या या सामान्य परिवाराचे मंगळवारच्या दुर्घटनेत होत्याचे नव्हत झाले होते.  या कठीण प्रसंगात श्रीम. नाईक व त्याच्या मुलाला आधार देण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी आर्थिक मदत केली. कै. सखाराम झोरे याच्या सामाजिक कार्याची आठवण जपत त्याच्या मित्र परिवाराने ही आर्थिक मदत करायचं ठरवल. आणि ही मदत गुरुवारी या कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आली. सरपंच सेवा संघाचे प्रविण गवस, साटेली भेडशीच्या सरपंच सौ. छाया  धर्णे, ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार गणपत डांगी, अमित सडेकर, बोडदे गावचे संदिप लक्ष्मण नाईक व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्राथमिक शिक्षक पतपेढी संचालक दयानंद नाईक व राकेश कर्पे व शिक्षक मित्रांच्या हस्ते नाईक कुटूंबाला मदत देण्यात आली.

शिक्षकांनी ज्ञानदानाच्या प्रवित्र कार्याबरोबर सामाजिक कार्याची परंपरा पार पाडली.  याबद्दल प्रविण गवस,सौ. छाया धर्णे यांनी कौतुक केले व आभार मानले. कै. सखाराम झोरेचे सामाजिक काम आम्ही असच पुढे चालू ठेवू असा मनोदय यावेळी शिक्षक मित्राचे प्रमुख  अरुण पवार, रवि देसाई,  जनार्दन पाटील, मणिपाल राऊळ श्रीम. प्राची गवस, सौ. पूजा जयेंद्र बिर्जे  व  महेश नाईक आदींनी व्यक्त केला.