राकेश फाले यांच्या कुटुंबियांना मंत्री केसरकरांकडून आर्थिक मदत

Edited by: संदीप देसाई
Published on: June 05, 2023 17:35 PM
views 164  views

दोडामार्ग : कुडासे येथील शेतकरी राकेश फाले यांच्या शेळ्या विषबाधेने मृत्युमुखी पडल्या त्याना आर्थिक मदत म्हणुन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी या आपतग्रस्त फाले कुटुंबाला  २५ हजार रुपये आर्थिक मदत केली आहे. तसेच शिंधुरत्न योजनेतून प्राध्यान्याने शेळीपालन साठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत फाले कुटुंबीय यांना दिलंय.

शिवसेना तालुका प्रमुख दोडामार्ग गणेशप्रसाद गवस, उपतालुका प्रमुख दादा देसाई, युवासेना तालुका प्रमुख भगवान गवस, मणेरी विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, तसेच राकेश फाले, रामा फाले,नागेश फाले , मेघशाम देसाई उपस्थित होते. फाले यांच्या १० हून अधिक शेळ्या पाण्यातून विष बाधा होऊन दगवल्या होत्या.