अखेर तिलारी घाटातून एसटी धावली

एसटीचं जंगी स्वागत
Edited by: लवू परब
Published on: April 02, 2025 15:44 PM
views 61  views

दोडामार्ग : अवजड वाहतुकीसाठी गेले ९ महिने बंद असलेल्या तिलारी घाटातून अखेर बुधवारी एसटी बस धावली.  सकाळी कोल्हापूर दोडामार्ग पणजी अशी पहिली एसटी बस सुरु झाल्यामुळे सर्वांच्याच मनात एकच आनंद होता. तालुक्यातील नागरिकांनी प्रवीण गवस व त्यांचे सहकारी यांचे मनापासून आभार मानले.

तिलारी घाट 20 जून ते 31 ऑक्टोबर पर्यंत एसटीचा अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले होते. यावेळी सर्व वाहतुकीबरोबर एसटी वाहतूकही पूर्णतः बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथील नागरिक प्रवासी तसेच शाळकरी मुले यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता याच पार्श्वभूमीवर येथील स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, दत्ताराम देसाई, अंकुश गावडे, अंकुश गवस  व तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच नागरिक त्यांनी वारंवार निवेदन उपोषण यासारखे विषय हाती घेऊन तिलारी घाटातून एसटी बस सेवा तात्काळ सुरू करा अशी मागणी केली होती. यावेळी कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी म्हटले होते की तिलारी घाट हा वाहतुकीसाठी धोकादायक आहे. संरक्षक कठडे काही ठिकाणी कोसळले आहेत. असे पत्र एसटी विभागाला दिले होते. त्यानंतर एसटी महामंडळाकडून सदर रस्त्याची डाग डुजी करून संरक्षक कठडे बांधून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत होत नाही तोपर्यंत एसटी बस सेवा सुरू करण्यात येणार नसल्याचे एसटी महामंडळाकडून कळविण्यात आले होते. त्यानंतर प्रवीण गवस व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार मागणी केल्यानंतर सदर घाट रस्त्यातील संरक्षक कठडे बांधून डागडुजी करण्यात आली. असे पत्र एसटी महामंडळाला दिल्यानंतर तब्बल ९ महिन्यांनी प्रवीण गवस व त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले. एसटी बस सेवा सुरु झाल्याने प्रवीण गवस व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात एकच आनंद दिसून येत होता.

तिलारी घाटातून बुधवारी दोडामार्ग मार्गे गोव्याला जाणारी कोल्हापूर दोडामार्ग पणजी अशी पहिली एसटी बस कोदाळी येथे आली. त्याठिकाणी एसटी चालक व वाहक यांना फेटे बांधून पुष्प हार घालून तसेच एसटी बसला हार घालून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, लक्ष्मण गावडे, अंकुश गवस, दत्ताराम देसाई, राजन गावडे, अमित देसाई, सचिन देसाई, भाऊसाहेब देसाई, लिंगाजी गवस, सुप्रिया गवस, प्रभावती केसरकर सोमा दळवी, शुभम गवस लक्ष्मण नाईक, अब्दुल नाईकवाडी आदी उपस्थित होते. यावेळी शाळकरी मुलेही त्या एसटी बस मधून शाळेत गेली.  बऱ्याच महिन्या नंतर एसटी बस आल्याने शाळकरी मुलांनीही आनंद घेतला. 

       

प्रवाशांचे समाधान हाच आनंद : प्रवीण गवस

तिलारी घाटातून एसटी बस स्टाइल भेडशी या ठिकाणी आली असता सर्वांनी जंगी स्वागत केले. यावेळी प्रवीण गवस बोलताना म्हणाले की आज तब्बल ८ ते ९ महिन्या नंतर अखेर एसटी बस तिलारी घाटातून सुरु झाली. कोदाळी येथील अंकुश गावडे, अंकुश गवस आणि विशेष करून आमदार शिवाजी पाटील व आपले दोडामार्ग तालुक्यातील सरपंच, नागरिक यांच्या मेहनतीमुळे आज यश आलं आहे. एसटी सेवा सूरू झाली म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. आणि बऱ्याच जाणानी आमचे कौतुक केल प्रवाशांनी समाधान मानले आणि प्रवाशांचे समाधान ही मोठी आनंदाची गोष्ट आहे असे गवस म्हणाले.