
कुडाळ :अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे...याच कारण वेगळच आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एस.टी.डेपो मैदानावर गेले दोन दिवस शिवगर्जना ह्या महानाट्याचे दोन्ही शो हाऊसफुल्ल झाले होते.यानंतर आज तिसरा दिवशी रविवारी शेवटचा शो होत आहे.आज रविवार सुपरसंडे असून आजच्या सुट्टीच्या दिवशी ह्या नाट्याला मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे.यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस संदर्भात अलर्ट झाली आहे. याचे कारण तेवढेच आहे की गेल्या दोन दिवसात विशाल सेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित शिवगर्जना हे महानाट्य हाऊसफुल झाल्यानंतर आज शेवटच्या सुपर संडेला फार मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. या निमित्ताने पोलिस यंत्रणेवर दोन दिवसानंतर आजच्या दिवशी फार मोठा ताण येण्याची शक्यता आहे.पहिल्या दिवशी सुमारे साठ ते सत्तर हजार लोकांनी हे नाटक पाहिले.तर दुसरा दिवशी सुमारे पन्नास हजार लोकांनी या महानाट्याचा आनंद घेतला.आज अंदाजे 80 हजाराच्या वर लोक येण्याची शक्यता आहे.यामुळे तोबा गर्दी होणार आहे.याचा ताण होवू नये म्हणून पोलीस यंत्रणेने जोरदार कंबर कसली आहे.