
सिंधुदुर्गनगरी : गेळे गावचा कबुलायतदार गावकर प्रश्ना संदर्भात शासन निर्णय होऊनही जिल्हाधिकारी जागा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहेत असा आरोप करत माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी आमरण उपोषण छेडले होते.
दरम्यान, या विषयी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती. त्यांच्या आश्वसनानंतर अखेर हे उपोषण सायंकाळी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिलेल्या पत्रानंतर गावडे यांनी मागे घेतले.