वैभववाडी : शहरातील पोलिस स्थानकासमोरील पेट्रोल पंपाच्या आवारात गुरुवारी सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे.हा तरुण कोकीसरे येथील असून लक्ष्मण यशवंत गुरव (वय ३२) असं यांचं नाव आहे.तो आईसह कोकीसरे येथे राहत होता.बुधवारी तो घरातून बाहेर पडला.सांगुळवाडी येथे क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी तो गेला होता.त्यानंतर तो घरी परतला नाही.गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह पेट्रोल पंपाच्या आवारात सापडला.यावेळी त्यांच्या अंगावरून अवजड वाहनाचे चाक गेल्याच्या खुणा आढळल्या होत्या.
संबंधित घटनेची बातमी पाहून त्याचा भाऊ आज सायंकाळी वैभववाडी पोलीस स्थानकात आला.त्याने ग्रामीण रुग्णालयात शवागृहात असलेला मृतदेह आपल्या भावाचा असल्याचे ओळखले.त्यानंतर पोलीसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.